जाहिरात

Pune News : पुण्यातील सारसबाग 2 दिवस बंद, महापौरांची मोठी घोषणा! प्रशासनाच्या निर्णयाची चर्चा का?

​​​​​​​Pune News: पुण्याचं हृदय समजली जाणारी सारसबाग आणि तिथलं पेशवेकालीन तळ्यातलं गणपती मंदिर दोन दिवस भाविक आणि पर्यकांसाठी बंद राहणार आहे.

Pune News : पुण्यातील सारसबाग 2 दिवस बंद, महापौरांची मोठी घोषणा! प्रशासनाच्या निर्णयाची चर्चा का?
Pune News : पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Pune News: पुण्याचं हृदय समजली जाणारी सारसबाग आणि तिथलं पेशवेकालीन तळ्यातलं गणपती मंदिर दोन दिवस भाविक आणि पर्यकांसाठी बंद राहणार आहे. 28 आणि 29 मे रोजी हे ठिकाण पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला महापालिकेकडून वेगळं कारण देण्यात आलं होतं, मात्र आता पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर या निर्णयाचं स्वरूप बदललं आहे.

महापौर आणि पोलिसांच्या भूमिकेत विसंगती

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला महापौरांच्या सोशल मीडिया टीमकडून मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही माहिती बदलण्यात आली. 

पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग आणि मंदिर परिसर दोन दिवस बंद ठेवला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महापौरांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय झाला असून, केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण ही माहिती पुणेकरांपर्यंत पोहोचवली आहे.

वादाची पार्श्वभूमी आणि बकरी ईदचं कनेक्शन

29 मे रोजी देशभरात बकरी ईद साजरी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सारसबाग बंद ठेवण्यात आल्यानं शहरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही काळापासून सारसबाग हे ठिकाण धार्मिक वादाचं केंद्र ठरलं आहे. बागेतील हिरवळीवर विशिष्ट समुदायाकडून मांसाहार केला जातो, ज्यामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. 

मागील वर्षी जून 2025 मध्येही भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी या संदर्भात पत्र दिल्यानंतर बकरी ईदच्या दिवशी बाग बंद ठेवण्यात आली होती. यावर्षी पुन्हा एकदा सुरक्षेचं कारण देत तोच कित्ता गिरवण्यात आल्यानं प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

( नक्की वाचा : Bakrid 2026 : मिरारोडमध्ये बकरा विरुद्ध डुक्कर वाद! पूनम सोसायटीतील त्या घटनेनं वातावरण तापलं! वाचा सर्व अपडेट )

सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रशासनावर निशाणा

प्रशासनाच्या या निर्णयावर सामाजिक स्तरावरून टीका देखील होत आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. प्रशासनानं नक्की कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या आधारावर हा निर्णय घेतला आहे, हे जाहीर करायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. दरवर्षी कारणांमध्ये होणारा बदल हा प्रशासकीय गोंधळ दर्शवतो, अशी टीका त्यांनी केली आहे. सार्वजनिक जागांचा वापर अशा पद्धतीनं बंद करणं हे सुशासनाचं लक्षण नसल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. यामुळे आता आगामी दोन दिवस सारसबाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com