राहुल वाघ
आपल्या पेक्षा सहा वर्षाने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात 32 वर्षांची विवाहीता होती. या दोघांचे अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते. या संबंधाना मुलाच्या घरच्यांचा विरोध होता. हा विरोध झुगारून तो तरूणी त्या विवाहीत महिलेसोबत लिव्ह इन मध्ये राहत होता. त्यासाठी त्याने स्वत:चे घर ही सोडले होते. पण जिच्यासाठी घर सोडले तिच त्याच्या जिवावर उठणार आहे याची पुसटती कल्पना ही त्याला नव्हती. शेवटी या नात्याचा थरारक अंत झाला. ही घटना नाशिकमध्ये घडली असून संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. या प्रकरणाची एक एक पान उलगडत गेलं. त्यानुसार ही केस ही उलगडत गेली. अंगावर काटा आणणारी ही घटना म्हणावी लागेल. नाशिकच्या पेठरोड परिसरात ही घटना घडली आहे.
सोनाली राजेंद्र गायकवाड ही विवाहीत होती. तिचे वय 32 वर्षे होते. ती अमोल पंढरीनाथ दांडगे या तरुणाच्या प्रेमात होती. त्याचे वय 26 वर्षे होते. या दोघांमध्ये अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते. सोनाली सोबतचे संबंध अमोलच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यामुळे अमोलने आपले घर सोडले. तो सोनाली सोबत साळवे चाळ,नवनाथ नगर इथं राहात होता. त्याच वेळी सोनाली हीला अमोलचे दुसऱ्या एक बाईसोबत संबंध असल्याचं समजलं. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. अशा स्थितीत सोनालीने अमोलचा काटा काढण्याचा ठरवलं. यासाठी तिने एक प्लॅन तयार केला.
नक्की वाचा - Bakrid 2026: ना कुर्बानी ना नमाज! बकरी ईद देशभर साजरी होत असली तरी 'हे' शहर आहे अपवाद
अमोल हा शरीराने रांगडा होता. त्यामुळे त्याला मारण्यासाठी सोनालीने या प्लॅनमध्ये आपली जाव आणि मैत्रिणीला सामावून घेतलं. त्यानुसार मंदाबाई गायकवाड, आणि वैशाली खरात यांची तिने मदत घेतली. त्यानंतर 25 मे च्या रात्री अमोलचा गळा आवळून खून करण्या आला. त्या वेळी सोनालीने अमोल चक्कर येवून पडल्याचा बनाव केला. शिवाय शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या गळ्यावरच्या खूणावरून तो चक्कर येवून पडला नाही हे डॉक्टरांच्या लक्षात आले. मात्र शवविच्छेदनानंतर त्याचा हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार पोलीसांनी सुत्र हलवली. त्यांनी सोनाली हीला ताब्यात घेतले. अमोल याच्या भावाच्या तक्रारी नुसार सोनाली विरुद्ध पंचवटी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी तपास केला जात असल्याचं पोलीसांनी सांगितलं आहे. काही आर्थिक वाद ही या हत्येमागे असल्याचं बोललं जात आहे. मात्र अनैतिक संबंधाचा असा अंत झाला. ज्या महिलेसाठी त्याने घर सोडले तिनेच त्याला अखेर यमसदनी धाडले. या घटनेनंतर अमोलच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना यावर अजून ही विश्वास बसत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world