जाहिरात

Video : रेल्वे स्टेशनवर भयानक गर्दी, 2 किमीची रांग, धक्काबुक्की, 16 तासांची प्रतीक्षा; हादरवून टाकणारं दृश्य

गुजरातच्या उधना रेल्वे स्टेशनवरील चित्र कोरोनाच्या काळातली नाहीत, ही गर्दी मोफत रेशनसाठी नाही...ही गर्दी म्हणजे व्यवस्थेचं अपयश आहे, असा संताप मजुरांकडून केला जात आहे.

Video : रेल्वे स्टेशनवर भयानक गर्दी, 2 किमीची रांग, धक्काबुक्की, 16 तासांची प्रतीक्षा; हादरवून टाकणारं दृश्य
  • उधना रेलवे स्टेशन पर हजारों प्रवासी श्रमिकों की भीड़ जमा हो गई, उन्हें कई घंटे लंबी कतारों में खड़े रहना पड़ा
  • भीड़ नियंत्रण को लेकर पुलिस ने कुछ लोगों पर बल प्रयोग किया, हालांकि लाठीचार्ज से साफ तौर पर इनकार किया है
  • महिलाओं और बच्चों समेत यात्रियों की स्थिति खराब हुई, कई जगहों पर धक्का-मुक्की और बैरिकेड तोड़ने की कोशिश हुई
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Gujrat News : गुजरातच्या उधना रेल्वे स्टेशनवरील चित्र कोरोनाच्या काळातली नाहीत, ही गर्दी मोफत रेशनसाठी नाही...ही गर्दी म्हणजे व्यवस्थेचं अपयश आहे, असा संताप मजुरांकडून केला जात आहे. गुजरातच्या उधना रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य तुम्हाला हादरवून टाकतील. हजारो स्थलांतरीत मजूर घरी जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांच्या पदरी आली धक्काबुक्की... पळापळ... आणि वरुन पोलिसांचा लाठीचार्ज. गुजरातवरुन सुटणाऱ्या फक्त दोन गाड्या, पण 8 हजारपेक्षा जास्त प्रवासी... परिणाम व्हायचा तोच झाला. 

मजूरांचे हाल...

चक्क दोन किलोमीटर लागलेली लांबच लांब रांग. 14 ते 16 तास याच रांगेत उभं राहण्याची शिक्षा, तेही 40 अंशांहून अधिक तापमानात. या प्रवाशांच्या नशिबी ना पिण्याचं पाणी.. ना स्वच्छतागृहाची सोय... ना डोक्यावर सावली. फक्त घरी जायचंय म्हणून ते उन्हातान्हात उभे आहेत आपलं वऱ्हाड पाठीवर घेऊन. रांग सोडली तर नंबर गमावण्याची भीती म्हणून भूक आणि तहानेने व्याकूळ झाले असतानाही भर उन्हात हाल होत असतानाही ट्रेनमध्ये जागा मिळेल या आशेने ते रांगेत तासनतास उभे राहिले. या निष्काळजीपणाचा परिणाम इतका गंभीर होता की उष्णतेमुळे दोन प्रवासी बेशुद्धही पडले. दोन्ही हातामध्ये सामान घेऊन गर्दीतून पळणाऱ्या प्रवाशाचे शब्द तुम्हाला रडवतील. 

नक्की वाचा - Indian Monsoon Alert : 'एका लहानग्याने' उडवली भारताची झोप, जगभरात उडाली खळबळ

हा आवाज या एकट्या प्रवाशाचा नाही तर तो आवाज आहे हजारो स्थलांतरित मजुरांचा. जे सूरतसाठी राबतात. मात्र गावी घरी जाताना त्यांना मिळणारी वागणूक ही माणुसकीला लाजवणारी आहे. ही परिस्थिती आणखीनच गंभीर झाली जेव्हा महिला आणि लहान मुलं या रांगेत अडकली. तासन्‌तास रांगांमध्ये उभ्या असलेल्या महिला… धक्का-बुक्कीमुळे घाबरलेली मुलं… रडणारी तान्ही बाळं… आणि निष्क्रिय व्यवस्था. संतापलेल्या प्रवाशांनी मग काही ठिकाणी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.  ड्रोनमधून दिसणारी ही दृश्यं कुठल्याही उत्सवाची नाहीत… ही गर्दी दिवाळीची नाही… ना छट पूजेची.. तरीही सणांपेक्षाही भयानक गर्दी. 

Latest and Breaking News on NDTV

कोचमध्ये आधी चढण्यासाठी उडालेली झुंबड… रांगा तुटल्या… आणि मग निर्माण झाली चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. प्रशासनाला हे सगळं आधीच ओळखता का आलं नाही? हा सवालच आहे.  रेल्वे प्रशासनाने दावा केलाय की, 6 स्पेशल ट्रेन चालवल्या. रात्रीच्या सुमारासही आणखी स्पेशल ट्रेन्स होत्या. मात्र प्रत्यक्ष चित्र काही वेगळंच सांगतं.. स्टेशनबाहेर फक्त दीड हजार लोकांची क्षमता असलेला शेड… आणि हजारो प्रवासी. हे नियोजन म्हणायचं, की फक्त लाल फितीचा कारभार? सूरतमध्ये काम करणारे लाखो स्थलांतरित मजूर गावी जाण्यासाठी दरवर्षी उधनाहून सुटणाऱ्या ट्रेन्सवर अवलंबून असतात. मात्र दरवर्षी तीच गर्दी… तीच अव्यवस्था… आणि प्रशासनाचे तेच दावे. रेल्वे प्रशासन या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय कधी करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
 

Latest and Breaking News on NDTV
Listen to the latest songs, only on JioSaavn.com