जाहिरात

Shocking! पीरियड्स आले, कपडे काढून पुरावा द्या,फोटो काढा; या विद्यापीठातील महिला कर्मचाऱ्यांसोबत भयंकर प्रकार

Rohtak News: महिला कर्मचाऱ्यांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडालीय. कुठे आणि कधी घडलीय घटना, नेमकं काय आहे प्रकार? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Shocking! पीरियड्स आले, कपडे काढून पुरावा द्या,फोटो काढा; या विद्यापीठातील महिला कर्मचाऱ्यांसोबत भयंकर प्रकार
"Haryana Shocker: महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन"
Canva

Rohtak News: पीरियड्स आल्याचा पुरावा मागितल्याचा धक्कादायक प्रकार महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत घडलाय. पीरियड्समुळे तब्येत ठीक नव्हती, यामुळे महिलांना कामातून थोडा वेळ विश्रांती हवी होती. ही बाब संबंधित महिलांनी अधिकाऱ्यांनाही सांगितली. पण सुपरव्हायजरने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही आणि कथित स्वरुपात या महिलांचे कपडे काढून मासिक पाळी आलीय की नाही? याचा तपास घेण्यास सांगितले. ही सूचना ऐकताच महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. हरियाणा राज्यातील महर्षी दयानंद विद्यापीठामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. 

दुसरीकडे अधिकाऱ्यांनी दावा केलाय की, महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली. विद्यापीठाचे रजिस्ट्रार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.  

Latest and Breaking News on NDTV

सुपरव्हायजरने मासिक पाळीची तपासणी करण्यास सांगितल्याचा आरोप 

महिला कर्मचाऱ्यांनी आरोप केलाय की, सुपरव्हायजरच्या आदेशानुसार एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने त्या महिलांना कपडे काढायला भाग पाडले. इतकंच नाही तर मासिक पाळीची तपासणी करण्यासाठी त्यांचे फोटोही काढण्यात आले. तपासणीच्या नावाखाली अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केलाय. असिस्टंट रेजिस्ट्रारने आदेश दिल्याची माहिती महिलांना देण्यात आली होती. तपासणीसाठी महिलांनी नकार दिला तेव्हा त्यांच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अन्य सफाई कर्मचाऱ्यांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 

पीड़ित महिला स्टाफ.

पीडित महिला कर्मचारी.

महिला सफाई कर्मचारी मासिक पाळीच्या वेदनांमुळे काम करत नव्हत्या 

विद्यार्थी संघटनांनीही महिला सफाई कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत दोषींना निलंबित करण्याची मागणीही केलीय. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. मासिक पाळीमुळे दोन महिला सफाई कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण ठरत होते, याची माहिती सुपरव्हायजरनाही देण्यात आली. तरीही महिलांसोबत गैरवर्तन करण्यात आले.  

Shocking: बलात्कारामुळे 5 वर्षांच्या चिमुकलीची प्रकृती गंभीर, CCTV फुटेजच्या आधारे 12 वर्षांचा आरोपी गजाआड

(नक्की वाचा: Shocking: बलात्कारामुळे 5 वर्षांच्या चिमुकलीची प्रकृती गंभीर, CCTV फुटेजच्या आधारे 12 वर्षांचा आरोपी गजाआड)Latest and Breaking News on NDTV

आरोपी सुपरव्हायजरची गच्छंती, कठोर कारवाई करणार 

विद्यापीठाचे कुलसचिव के.के. गुप्ता यांनी सांगितले की, "महिलांसोबत करण्यात आलेल्या गैरवर्तन प्रकरणाची चौकशी केली जाईल. आरोपी सुपरव्हायजरची हकालपट्टी करण्यात आलीय. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही. आवश्यकता भासल्यास आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला जाईल. भविष्यात कोणत्याही महिला कर्मचाऱ्याविरुद्ध असे वर्तन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल."

Pune News: 'मला प्रेग्नेंट करू शकेल अशा पुरुषाच्या शोधात' या वाक्याला पुण्याचा ठेकेदार भुलला आणि भलताच अडकला

(नक्की वाचा: Pune News: 'मला प्रेग्नेंट करू शकेल अशा पुरुषाच्या शोधात' या वाक्याला पुण्याचा ठेकेदार भुलला आणि भलताच अडकला)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com