जाहिरात

Glowing Face Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहरा काळा पडू लागतो? काय केल्यास चेहऱ्यावर ग्लो येईल

Glowing Face Tips: चेहरा अचानक काळा पडण्यामागील कारण काय? हिवाळ्यात विशेषतः चेहरा काळा पडू लागतो. शरीरातील कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचा काळी पडू लागते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Glowing Face Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहरा काळा पडू लागतो? काय केल्यास चेहऱ्यावर ग्लो येईल
"Face Glowing Tips: काळवंडलेल्या त्वचेची समस्या कशी दूर करावी?"
Canva

Glowing Face Tips: चेहरा सुंदर दिसावा म्हणून लोक कित्येक महागड्या ट्रिटमेंट्स करतात, महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. इतका खर्च करूनही चेहऱ्यावर अपेक्षेप्रमाणे तेज दिसत नाही. मेकअप, क्रीम यासारख्या गोष्टी तात्पुरते उपाय आहेत. पण या समस्येचे मूळ शोधून त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे. शरीरातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळेही त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात. एकूणच केवळ धूळ-प्रदूषणामुळेच नव्हे तर डाएट आणि लाइफस्टाइलमुळेही त्वचेचे नुकसान होते. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आणि कोणत्या सवयींमुळे त्वचेवरील नैसर्गिक तेज कमी होते, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

1. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग काळा होतो? (Which Vitamin Deficiency Makes Skin Dark)

तुमची त्वचा टॅन किंवा काळी पडत असेल तर हे व्हिटॅमिन B12च्या कमतरतेचे संकेत असू शकतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पिग्मेंटेशनची समस्या वाढते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. दुसरीकडे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळेही त्वचेवरील चमक कमी होते, त्वचा काळवंडू लागते. 

2. कोणत्या व्हिटॅमिनमुळे त्वचा काळी पडते?

कोणत्याही प्रकारचे व्हिटॅमिन थेट त्वचा काळी करत नाही, पण व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे त्वचेवरील तेज कमी होऊ लागते. शरीरातील मेलेनिनचे संतुलन बिघडते. यामुळे त्वचेच्या रंगावर दुष्परिणाम होतात. विशेषतः जे लोक उन्हाच्या संपर्कात जास्त असतात आणि सनस्क्रीन वापरत नाही, अशा लोकांमध्ये ही समस्या अधिकतर आढळते.  
 

Latest and Breaking News on NDTV

3. त्वचा काळी पडण्यामागील अन्य कारणं? 

सूर्याची प्रखर किरणे, अपुरी झोप, तणाव, हार्मोनल बदलाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही त्वचा काळी पडू लागते. काही प्रकरणांमध्ये चुकीच्या ब्युटी प्रोडक्ट्सच्या वापरामुळेही त्वचेवर दुष्परिणाम होतात.   

4. कोणत्या गोष्टींमुळे शरीरामध्ये मेलेनिन वाढते? 

त्वचा सुंदर आणि निरोगी राहावी याठी अंडी, दूध, मासे, गाजर, पपई, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचा डाएटमध्ये समावेश करावा. यातील व्हिटॅमिन A, C, E आणि B12 मेलेनिन नियंत्रित ठेवण्याचे काम करतात आणि त्वचेवर नैसर्गिक तेज येते. 

Vitamin D: दुपारच्या उन्हाद्वारे Vitamin D मिळते? किती वाजता आणि किती वेळ उन्हात बसावे? AIIMSच्या डॉक्टरांनी दिली माहिती

(नक्की वाचा: Vitamin D: दुपारच्या उन्हाद्वारे Vitamin D मिळते? किती वाजता आणि किती वेळ उन्हात बसावे? AIIMSच्या डॉक्टरांनी दिली माहिती)

5. चेहरा काळा पडल्यास काय करावे?

  • सर्वप्रथम सनस्क्रीन लावण्यास सुरुवात करा आणि जास्त प्रमाणात पाणी प्यावे. 
  • ब्युटी केअर रुटीनमध्ये लिंबू आणि अ‍ॅलोव्हेरा जेलचा समावेश करावा. 
  • डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.   
  • पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com