जाहिरात

Ranjangaon MIDC: रांजणगाव एमआयडीसीत खळबळ! कामगारांचे 'पलायन'; उद्योगांना घरघर, नेमकं काय घडलं?

दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक असलेला घरगुती गॅस उपलब्ध होत नसल्याने कामगारांनी थेट काम सोडून आपल्या मूळ गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

Ranjangaon MIDC: रांजणगाव एमआयडीसीत खळबळ! कामगारांचे 'पलायन'; उद्योगांना घरघर, नेमकं काय घडलं?

यशपाल सोनकांबळे, पुणे:

Ranjangaon MIDC Gas Shortage:  इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती देशातून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्याने, भारतात, विशेषतः महाराष्ट्रात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याने मुंबई व ठाण्यातील २०% ते ५०% हॉटेल्स, तसेच पुण्यात अनेक औद्योगिक कारखाने व दाहिन्या बंद पडल्या असून, सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावरही या टंचाईचा परिणाम होत आहे. अशातच पुण्यामध्ये रांजणगाव एमआयडीसीमध्ये या गॅस बंदीचा मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. 

रांजणगाव एमआयडीत खळबळ, कामगारांचे पलायन 

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  एमआयडीसी परिसरात निर्माण झालेल्या तीव्र गॅस टंचाईने उद्योग क्षेत्राला मोठा हादरा बसला असून, कामगारांनी मोठ्या प्रमाणावर गावाकडे पलायन करण्यास सुरुवात केली आहे. दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक असलेला घरगुती गॅस उपलब्ध होत नसल्याने कामगारांनी थेट काम सोडून आपल्या मूळ गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

Sunil Tatkare: अशोक खरात प्रकरण तटकरेंनाही भोवणार; चाकणकरांप्रमाणे फोटो व्हायरल झाल्याने अडचणीत?

या गंभीर परिस्थितीमुळे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांसमोर मनुष्यबळाचे मोठे संकट उभे राहिले आहे. गॅस टंचाईमुळे कामगारांना स्वयंपाक करणे कठीण झाले असून, खानावळी आणि मेसवरही याचा परिणाम झाला आहे. परिणामी, हवालदिल झालेल्या हंगामी व स्थलांतरित कामगारांनी बेरोजगारी स्वीकारून गाव गाठणे पसंत केले आहे.

 यामुळे अनेक कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया मंदावली असून काहींचे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. कामगारांच्या या स्थलांतरामुळे कंपन्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. यावर प्रशासन काय तोडगा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

पुण्यात शहरात योग्य प्रमाणात गॅस पुरवठा

दरम्यान,  गेल्या काही दिवसापासून शहरात सिलेंडरच्या मागणी पुरवठ्यातील तफावत दूर करण्याचा जिल्हा प्रशासनाने तेल कंपनीने केलेल्या प्रयत्नांना परिणाम दिसू लागले आहे. असून ग्राहकांनी मंगळवारी आणि बुधवारी केलेल्या सिलेंडर नोंदणी पेक्षा अधिक सिलेंडर वितरित करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. गुरवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यातून 63 हजार 391 ग्राहकाने सिलेंडर साठी नोंदणी केली,जिल्ह्यातील सिलेंडर वितरकांकडून 72 हजार 553 ग्राहकांना घरपोच सिलेंडर पोचविण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

VIDEO: 'दूध प्यायचंय...', स्तनपान करणाऱ्या महिलेला पाहून Dmart कर्मचाऱ्याचं विकृत कृत्य; नेटकऱ्यांचा संताप

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com