जाहिरात

भारतामध्ये लोकप्रिय असणाऱ्या 'या' 5 खाद्यपदार्थांना अन्य देशात आहे बंदी!

आपल्या देशात वेगवेगळ्या संस्कृतीप्रमाणेच खाद्यपदार्थांचीही रेलचेल आहे. आपल्यासारखी खाण्याची व्हरायटी फारच कमी ठिकाणी मिळते. पण काही भारतीय पदार्थांना अन्य देशात बंदी आहे. आपल्याकडे लोकप्रिय असलेले पण इतर देशांमध्ये बंदी असलेले पदार्थ कोणते आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • आपल्याकडं जेवणात दही हमखास असतं. पण, अमेरिकेत काही ठिकाणी दह्यावर बंदी आहे. दही हे ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि स्थूलपणा याला कारणीभूत आहे, असा तेथील अन्न आणि औषध प्रशासनाचा दावा आहे.
  • पकोड्यापासून ते सँडविचपपर्यंत कोणतंही स्नॅक्स केचपशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण फ्रान्समध्ये केचपलाच बंदी आहे. तेथील टीनएजर्स आवश्यकतेपेक्षा जास्त याचं सेवन करतात, म्हणून केचपला फ्रान्समध्ये बंदी घालण्यात आली आहे.
  • सिंगापूर हा देश स्वच्छतेच्या काटेकोर नियमांमुळे ओळखला जातो. 'स्वच्छ देश' ही आपली ओळख कायम राहावी या कारणासाठी 1992 पासून सर्व प्रकारचे च्युइंग गमची विक्री आणि व्यापार करण्यावर इथं बंदी घालण्यात आली आहे.
  • बटाटा आणि मैद्याचे मिश्रण अससलेले सामोसे हे आपल्याकडं प्रचंड लोकप्रिय आहेत. अनेक जण चहा आणि सामोसा हे कॉम्बिनेशन रोज घेतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सोमालियामध्ये सामोसा खाण्यास पूर्ण बंदी आहे.
  • आपल्याकडं हिवाळ्यात च्यवनप्राश खाल्ला जातो. पण, काही वृत्तांनुसार कॅनडामध्ये 2005 पासून याला बंदी आहे. यामध्ये लेड आणि मर्क्युरीचे प्रमाण अधिक असल्यानं कॅनडात च्यवनप्राशवर बंदी घालण्यात आली आहे.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com