बीड मधील खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिस मध्ये शरण आला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी नंतर केस न्यायालयाने वाल्मीक कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी ही पोलीस कोठडीत करण्यात आली