राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजून युतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र असे असताना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडनगर परिषदेसाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अब्दुल समीर शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूक लढवणार असून, त्यांचा सामना थेट भाजपशी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पहिली फूट पडली अशी चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान याबाबत अब्दुल समीर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी