हॉटेलमधून बाहेर पडताना Aditya Thackeray यांचा Eknath Shinde यांना टोला, नेमकं काय म्हणाले?

सॉफिटेल हॉटेलमधून बाहेर पडताना आदित्य ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावलाय. हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. या बातम्या पाहून आता एक व्यक्ती गावाला जाईल. असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.आदित्य ठाकरे यांच्या या विधानाचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे होता.जेव्हा-जेव्हा एकनाथ शिंदे नाराज असतात तेव्हा ते गावाला जातात अशी टीका ठाकरे गटाकडून वारंवार केली जाते. त्यामुळे आताही आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमधून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचं दिसत आहे.त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ