शेतकरी कर्जमाफीवरील वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर विखे पाटलांसदर्भात बच्चू कडूंनी केलेल्या विधानानं राजकीय वातावरण चांगलेच तापलंय. विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस देईन” असं विधान बच्चू कडू यांनी केल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिलीये.