अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मरोळा गावातील एका ध्येयवेड्या शेतकऱ्याने खारपानपट्ट्यातही शेतीत क्रांती घडवून आणली आहे. पारंपारिक सेंद्रिय पद्धतीला फाटा देत त्यांनी 14 एकर शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. दूरवर पाण्याचा कोणताही स्त्रोत नसताना गोळ्या पाण्याची व्यवस्था करून ठिबक सिंचनाच्या आधारे विविध फळझाडे आणि वृक्षारोपणयुक्त झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली...या उपक्रमामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी दिशादर्शन मिळत आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी.