अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दफन वांगणी इथल्या स्मशानभूमीमध्ये करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. त्याच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी बदलापूर कल्याण, उल्हासनगरमध्ये जोरदार विरोध होतोय. त्यानंतर त्याचा मृतदेह वांगणीच्या दिशेने नेण्यात आल्याची माहिती समोर येतेय. अक्षय शिंदेचा मृतदेह वांगणीमध्ये दफन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.