प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये सरासरी साडे तीन लाख मतदार आहेत. मतदान केंद्रावरती मतमोजणीच्या सरासरी वीस ते तीस फेऱ्या होणार आहेत. सरासरी चौदा ते सतरा टेबल वरती ही मोजणी होणार आहे. मात्र या फेऱ्यांमध्ये बरेचदा कल जे आहेत ते समोर यायला सुरुवात झाल्यानंतर विसाव्या किंवा पंचविसाव्या फेरीपर्यंतच निकाल हाती आलेले असतात मात्र यावेळेला प्रत्येक शेवटच्या फेरीपर्यंत प्रत्येकाचं लक्ष या संपूर्ण प्रक्रियेकडे असणार आहे