मुंबईतील ऐतिहासिक बांद्रा किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र पर्यटन विभागानेच या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा आरोप करण्यात आलाय. ज्याला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिकेनेही परवानगी दिलीय. पोर्तुगीज, ब्रिटीश आणि मराठा इतिहासाची साक्ष देणारा हा मुंबईतला वांद्रे किल्ला आहे.. मात्र याच ऐतिहासिक वारसा स्थळावर दारू पार्टी रंगल्याने संतापाची लाट उसळलीय. ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत हा व्हिडिओ पोस्ट केलाय..