गाईने पळवलं नागरिकांच्या तोंडचं पाणी, अख्खं गाव रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात, काय घडलं पाहा

छत्रपती संभाजीनगरच्या फारोळ गावात एक अजबच प्रकार घडलाय. आठ दिवसांपूर्वी या गावातील एका गाईच्या वासराला पिसाळलेला कुत्रा चावला. काल सकाळी हा वासरू मृत्युमुखी पडला. विशेष म्हणजे वासरू गायीच दूध पीत असल्यानं गाईला देखील याच इन्फेक्शन झाल्याची अफवा गावात पसरली. बरं या गायीच दूध गावातल्या अनेक घरांना पुरवठा केला जात होतं. त्यामुळे आपल्याला देखील इन्फेक्शन होईल म्हणून अख्खं गाव शासकीय रुग्णालयात रेबीज च इंजेक्शन घेण्यासाठी पोहोचलं.

संबंधित व्हिडीओ