बीडच्या अंबाजोगाईतील देवळा गावात किरकोळ वादातून एका तरुणाला 2 दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीय. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला होता, त्याच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय. अविनाश सगट असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.