बीडच्या पेठ बीड भागातून मारहाणीचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय.३ ते ४ जणांकडून बेदम मारहाण करण्यात आलीय, मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय.आकाश माने असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बीड शहरातील बहिरवाडी परिसरात घरी जाऊन मारहाण केली.तर मारहाण करणाऱ्यांमध्ये फरार कुख्यात आरोपी सिद्धार्थ जाधव, रोहित जाधव आरोपींचा समावेश आहे.चोरी, मारहाण, गोळीबार, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत, मारहाण 8 दिवसांपूर्वी केली आहे.मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय. दहशतीमुळे अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे