मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली की, काँग्रेस मुंबई मनपा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मनसे सोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.