चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला गेला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातील लोकं, विशेषतः शेतात काम करणारे लोकं आणि गुराखी हे बळी पडतात, यावर उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यासह इतर साहित्य वाटप करण्यात आले आहे. या साहित्यामुळे अचानक वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यास बचाव करणे सोपं जातं. त्यामुळे काही प्रमाणात तरी मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येईल ही अपेक्षा आहे. याचा आढावा घेतला आमचे चंद्रपूर प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी.