गाडीच्या दर्शनी भागावर नसलेले फास्टॅग आता काळ्या यादीत टाकले जाणार आहेत.काही वाहनचालक गाडीच्या काचेवर फास्टॅग न लावता तो आतमध्ये ठेवतात आणि टोलनाक्यांवर आल्यावर तो दाखवतात. पण यापुढे असं केल्यास त्या वाहनचालकाचा फास्टटॅग काळ्या यादीत टाकला जाणार आहे.NHAI म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा नवा नियम लागू केलाय. या नियमामुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी होण्यास मदत होणार असून गैरप्रकारांनाही आळा बसेल असा महामार्ग प्राधिकरणाचा दावा आहे.