मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी बातमी आलीय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे काल तब्बल तीन तास एकाच हॉटेलमध्ये होते. वांद्रेमधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून उपस्थित होते.. त्यात त्यांची बैठक झाल्याची माहिती समोर येतीय.देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सोफिटेल हॉटेलला गेले होते, असं सांगण्यात येतंय. दरम्यान, आमच्या प्रतिनिधीने आदित्य ठाकरेंना याबाबत विचारल त्यावेळी त्यांनी भेटीवर बोलणं टाळलं मात्र चर्चा सुरु आहेत तर सुरुच राहू द्या, असं वक्तव्यही त्यांनी केलंय.अधिवेशन काळात फडणवीसांनी ठाकरेंना ऑफर दिली होती.. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीसांच्या चार भेटी झाल्या.. त्यानंतर आता पुन्हा आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटल्याची चर्चा आहेत.आतापर्यंत ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटी कशा पार पडल्या