बारामतीकरांनी नगरपरिषदेत सेवा करण्याची संधी द्यावी प्रत्येक कुटुंबाला दहा हजार अन् मागेल त्याला वन बीएचके देईन, असं आश्वासन बहुजन समाज पक्षाच्या काळूराम चौधरींनी दिलंय.. बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी बहुजन समाज पार्टीचे महासचिव काळूराम चौधरींनी लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.. यानंतर काळूराम चौधरींनी बारामतीकरांनी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदी निवडून देत सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली.. जर संधी मिळाली तर प्रत्येक कुटुंबाला वर्षाला नगरपरिषदेच्या बजेटमधून दहा हजार रुपये आणि मागेल त्याला वन बीएचके घर देईल असं म्हटलंय.. दरम्यान त्यांचा विजय निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.