इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली.काँग्रेसच्या खरगेंकडून 3 विषयांवर अजेंडा सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. राहुल गांधी यांच्याकडूनही काही मुद्दे बैठकीत सादर करण्यात आलेत.अधिवेशनात काही मुद्दे प्राधान्याने मांडणार असल्याचंही समजतंय. पहलगाम हल्ला, बिहार निवडणूक मतदार यादी, गाझा ते चीनपर्यंतचं परराष्ट्र धोरण यासंदर्भात इंडिया आघाडी आपले मुद्दे मांडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काही मुद्दे मांडलेत.. तर शरद पवारांसह इतर नेत्यांनीही गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली.