जळगाव जिल्ह्यात वरणगावमध्ये नगर परिषद निवडणुक पूर्वीच भाजपमध्ये फूट पडलीये... जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली जात असल्याने भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत...तसेच पक्षाकडून जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात असल्याने भाजपच्या नेत्यांनी विरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह माजी नगरसेवकांना पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्यास वरणगाव मध्ये भाजप बंडखोरी होण्याची शक्यता आहे.