आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशीना महापूजा करायला मिळाली. हे आमचे भाग्य आहे. देवाच्या आशीर्वादानुसार आपण मस्तक ठेवत असतो. यापुढेही विठोबाचा आशीर्वाद राहू दे. आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद विठ्ठल देणार आहे. म्हणूनच कार्तिकीची महापूजा मिळाली. तर आषाढी वारीची विठोबाची शासकीय महापूजा करायला आपणास निश्चित आवडेल. अशी इच्छा एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केली.