आज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला सगळ्यात मोठा दिवस आहे. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रानं अनेक राजकीय भूकंप अनुभवले. पाच वर्षात तीन शपथविधी दोन सरकार आणि दोन राजकीय पक्षांमधली फट मतदारांनी पाहिली फोडाफोडीच्या राजकारणांनी अवघ्या महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं होतं मात्र आज जनतेनं कोणाचा निर्णय केलाय हे स्पष्ट होणार आहे.