राज्यात आता तीन नव्या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. कोल्हापूर ते पुणे, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर या नव्या वंदे भारत धावणार आहेत. पुणे कोल्हापूर हुबळी मार्गावर धावणारी आठ डब्यांची वंदे भारत ट्रेन ही आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.