ठाणे महानगरपालिकेमध्ये मोठे आंदोलन सुरू झाले आहे. घोडबंदर रोड येथील आनंद नगरमधील स्वामी समर्थ मठावर कारवाई करू नये, या मागणीसाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला आहे. भक्तांनीही आयुक्तांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पालिकेत तणाव आहे.