आता नितेश राणे विरुद्ध उदय सामंत वाद रंगण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर आता नितेश राणे यांनी जशास तसे उत्तर दिलंय.. कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं थेट आव्हान त्यांनी उदय सामंत यांचं नाव न घेतला दिलं... कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. त्यालाच नितेश राणे यांनी नाव न घेता उत्तर दिलं.