डहाणू तालुक्यातील कासा येथील स्मशानभूमीत अघोरी प्रथा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे...सूर्या नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत लिंबू, शेंदूर, गुलाल, लाल कापड आणि लाकडी क्रॉस अशी धक्कादायक सामग्री अशा दृश्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... मध्यरात्रीच्या सुमारास काही इसमांनी येथे अघोरी प्रथेचा प्रयत्न केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे...स्थानिकांनी पोलिसांकडे सदर इसमांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे..