Pandharpur| संत सावता माळींना दर्शन देण्यासाठी पांडुरंगाच्या पालखीचं प्रस्थान| NDTV मराठी

संत सावता माळींच्या भेटीसाठी आज पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांची पालखी आरणकडे प्रस्थान झाली.कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी म्हणत संत सावता माळी यांनी आपल्या कामात विठ्ठल पाहिला.म्हणून आषाढी वारीनंतर प्रत्यक्ष विठ्ठल संत सावता माळी यांचे दर्शन देण्यासाठी जातात.याकरिताच आज परंपरेप्रमाणे काशीकापडी समाज आणि प्रसाद कळसे यांच्या घरातून पांडुरंगाच्या पादुकांनी अरणकडे प्रस्थान ठेवले.पंढरपूर ते अरण हा पालखी सोहळा पायी जात असतो.यामध्ये यंदा प्रथमच आमदार अभिजीत पाटील हे 15 किमी पायी चालत रोपळेपर्यंत प्रवास करणार आहेत.हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाचा पालखी सोहळा निघाला.

संबंधित व्हिडीओ