Politics of Maharashtra | राज्यात आजपासून निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात, जाणून घेऊया Updates

राज्यात आजपासून निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालीय.राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज मागे घ्यायची शेवटी मुदत 21 नोव्हेंबर ही असून उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. पुण्यात भाजपने आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी तयारीला गती दिली आहे.जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज दिवसभर पुण्यात घेतल्या जात आहेत. या मुलाखतींना जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील.जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहणार असून पक्षाच्या विजयासाठी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ