Pune Crime News | पुण्यात वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला? कालच्या घटनेबाबत मोठी अपडेट समोर | NDTV

पुण्यात वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी समीर काळेच्या भावाची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे.. कोंढव्यात पिस्तूलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करत एकाचा खून करण्यात आला.. गणेश काळे असं हत्या झालेल्याचे नाव आहे.. गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. त्यामुळे या खूनाला टोळी युद्धाची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.. सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षी वनराज यांचा गोळ्या झाडून, कोयत्याने वार करत खून केला होता.. वनराज यांच्या खूनात वापरलेली पिस्तूले समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणल्याचे पोलिस तपासात पुढे आलं होतं.. काल दुपारी गणेश हा आपल्या रिक्षातून निघाला होता.. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. तसेच कोयत्याने वार केले... दरम्यान, याप्रकरणी आता चार जणांना अटक करण्यात आलीय.. यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत

संबंधित व्हिडीओ