Pune| जुबेर हंगरगेकरच्या चौकशीत धक्कादायक माहिती, जुबेरच्या मोबाईलमध्ये पाकसह सौदीचे नंबर | NDTV

पुण्यातल्या कोंढवा परिसरातून अटक करण्यात आलेल्या जुबेर हंगरगेकरच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलीय.जुबेरच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानसह सौदी अरेबियाचे नंबर आढळून आले आहेत.. जुबेरचा जुना मोबाईल एका साथीदाराच्या घरातून जप्त करण्यात होता. त्या मोबाईलमध्ये पाकिस्तान, ओमान, सौदी अरेबिया, कुवैतचे नंबर सेव्ह केल्याचं दिसून आलंय. अल कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेसोबत जोडण्यासाठी जुबेर तरुणांना प्रोत्साहित करत होता. कौसरबागमध्ये तो आक्रमक उपदेश द्यायची.. जुबेर हंगरगेकरला अटक केल्यानंतर त्याच्या काही साथीदारानं संशयित पुस्तक तसंच कागदपत्र गोळा करून जाळल्याचीही माहिती मिळतेय.. काळेपडळ परिसरातील मदरशाच्या मोकळ्या जागेत ही कागदपत्र जाळल्याचं समोर आलंय.

संबंधित व्हिडीओ