Satara Doctor Case | सातारा डॉक्टर प्रकरणात मोठा निर्णय, आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत बदल; Updates

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्याची मागणी करण्यात येत होती.. त्यानंतर आता आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आलीय. तसेच या प्रकरणात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले आहेत. तेजस्वी सातपुते या 2012 सालच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेता या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे. आजपासूनच एसआयटी फलटणमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय.. पोलिसांनी त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावलीय. त्यामुळे आता दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आलीय..

संबंधित व्हिडीओ