विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. काल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जहरी टीका केली होती त्यावर आता भाजपनेही उत्तर दिलंय. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि लागलो तर सोडत नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांचा तो video share करा. ठाकरेंना भाजपकडून इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत twitter account वरून हा video share करण्यात आलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी देखील ठाकरेंवर निशाणा साधलाय. मनगटात ताकद असावी लागते असा टोला शिंदेंनी लगावलाय. दरम्यान फडणवीसांच्या tweet वरून आता संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलंय.