Sindhudurg | पंचनाम्याची वाट न बघता सरकारने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी- Vaibhav Naik |NDTV मराठी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास साडेपाच महिने पाऊस सुरु असून सरकारने उशिरा का होईना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.परंतु मागील नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही. यावर्षी पीक विमा देखील सरकारने बंद केल्याने या नुकसानीत विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले असते ते देखील मिळणार नाहीत. मात्र सातत्याच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात, भुईमूग व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पंचनाम्याची वाट न बघता सरकारने सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे अशी मागणी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे केली आहे.

संबंधित व्हिडीओ