नाशिकच्या भगूर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत फूट पडलीय.. त्याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झालीय... शिवसेना शिंदे गटाला महायुतीपासून दूर ठेवण्यात आलंय.. शिंदे गटाच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे.. भाजपच्या पाठिंब्याने भगूर नगरपरिषद राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार आहे.. राष्ट्रवादीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकावडे यांच्या नावाची नगराध्यक्ष उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आलीय.. दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजपानंतर शिंदे गटाकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आलाय... शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.. त्याचबरोबर भाजप राष्ट्रवादीकडून कुठलाही युतीचा प्रस्ताव नाही, त्यामुळे चर्चा न झाल्याचं स्पष्टीकरणही शिंदे गटाने दिलंय..