मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका महिलेने राडा घातला. मानसिक रुग्ण असलेली ही महिला बिनदिक्कतपणे मंत्रालयाच्या सचिव gate मधून आत जाते देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करते मात्र तरीही सुरक्षारक्षक गाफील राहतात.