थोरात समर्थक संगमनेर तालुका पोलीस स्टेशन च्या ठिकाणी जमा झाले होते. थोरात यांची कन्या जयश्री थोरात तसेच माजी आमदार सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी रात्रभर ठिय्या देत वक्तव्य करणारे देशमुख आणि सुजय विखे यांच्या अटकेची घोषणा करत यावेळेस मागणी देखील केली आहे.