एकोणीस दिवसांपासनं पोलीस शोध घेतायेत. पण पोलिसांना तीन प्रमुख आरोपींना पकडण्यात यशच येत नाहीये. दुसरीकडे या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराडही पोलिसांच्या हाती लागत नाहीये. आणि अशातच संतोष देशमुखांच्या फरार आरोपींची हत्या झाल्याचा दावा करणारी एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे.