रामटेक मतदारसंघात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी उपस्थित सभेला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी-शाहा यांच्यासोबत राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला.