पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. सध्या राज्यभरात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा फिरतेय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या यात्रेचं नेतृत्व करतायत. ही यात्रा अहमदनगरमध्ये गेली मात्र कर्जत जामखेड या मतदारसंघात यात्रा फिरकलीही नाही.