Sharad Pawar Ajit Pawar Alliance? | राष्ट्रवादी विलीन होणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची NDTV मराठीला माहिती शरद पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवार गटात चर्चा सुरु असल्याची माहिती मिळतीय.अजित पवारांनी आपल्या आमदारांकडे विचारणा केल्याची माहिती मिळतीय.राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ही माहिती दिली.शरद पवारांसोबत गेल्यास काय फायदा काय तोटा होईल याची चाचपणी अजित पवारांकडून सुरू असल्याची सूत्रांची माहिती तर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फायदा होईल, अशी माहिती काही आमदारांनी अजित पवारांना दिल्याची माहिती.स्वतंत्रपणे लढल्यानं ग्राऊंडवरील कार्यकर्ता विभागल्यानं ग्रामीण भागात अजित पवार आणि शरद पवार या दोनही गटाला फटका बसण्याची शक्यता… काही आमदारांनी व्यक्त केली हेत. तर अजित पवार यांच्या गटातील बड्या नेत्यांनी आता परत शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे…