शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावर सुनील तटकरेंनी मोठं विधान केलंय.वेगळं होण्याचा निर्णय भाजपशी बोलून घेतला होता, एकत्र येण्याचा निर्णय देखील भाजपला विचारावा लागेल असं विधान केल्याने आता चर्चांना उधाण आलंय. तर असं काही घडतंय का पहिलं बघावं लागेल असं विधान छगन भुजबळांनी केलंय. दरम्यान एकत्र येण्यासाठी अमित शहा यांना विचारायला पाहिजे.असं राऊत म्हणालेत.त्यांचा पक्ष आणि शिंदे पक्ष यांचे प्रमुख अमित शहा आहेत..दोन्ही पक्षांना अमित शाहांनी जन्म दिला आहे.असं राऊत म्हणालेत...