विराट कोहलीने या एका गोष्टीसाठी सोडले कॅप्टनपद, स्वतःच केला खुलासा 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

क्रिकेटर विराट कोहलीने 2021मध्ये वर्ल्ड कप सामन्यांनंतर टी20 टीमचे कॅप्टनपद सोडले होते. 

Image credit: Virat Kohli Insta

यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचीही कॅप्टनशिप सोडली. 

Image credit: Virat Kohli Insta

वर्षभरानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या पराभवानंतर त्याने टेस्ट टीमचेही कॅप्टनपद सोडले. 

Image credit: Virat Kohli Insta

विराट कोहलीने एकामागोमाग एक असे निर्णय का घेतले? याचे कारण चाहत्यांना जाणून घ्यायचे होते. 

Image credit: Virat Kohli Insta

इतक्या वर्षांनंतर कोहलीने स्वतःच 'आरसीबी बोल्ड डायरीज' पॉडकास्टच्या माध्यमातून या निर्णयामागील खुलासा केलाय. 

Image credit: Virat Kohli Insta

कोहली म्हणाला की, 'कारकिर्दीत अशा टप्प्यावर पोहोचला होतो, जेथे सातत्याने लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते'.

Image credit: Virat Kohli Insta

माझ्या करिअरमध्ये बरेच काही घडत होते. 7-8 वर्षे भारताचे नेतृत्व करत होतो. 9 वर्षे RCBचे नेतृत्व केले: विराट कोहली

Image credit: Virat Kohli Insta

मी कोणतीही मॅच खेळलो तरी बॅटिंगबाबत माझ्याकडून खूप अपेक्षा केल्या जात होत्या: विराट कोहली

Image credit: Virat Kohli Insta

लक्ष केंद्रित करण्यासाठी मी खूप संघर्ष करत आहे, याची मला जाणीव होत नव्हती: विराट कोहली

Image credit: Virat Kohli Insta

कॅप्टनशिपमध्ये असे होत नसेल तरी बॅटिंगमध्ये असे घडत होते. मी सतत याचा विचार करायचो: विराट कोहली

Image credit: Virat Kohli Insta

ही बाब माझ्यासाठी खूप कठीण ठरत होती आणि शेवटी याचा माझ्यावरच परिणाम झाला: विराट कोहली

Image credit: Virat Kohli Insta

 सार्वजनिक जीवनात खूश राहण्यासाठी मी संघर्ष करत होतो: विराट कोहली

Image credit: Virat Kohli Insta

म्हणूनच मी कॅप्टनपद सोडले कारण मला या खेळात टिकून राहायचे असेल तर माझ्यासाठी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे: विराट कोहली

Image credit: PTI

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कॅप्टनपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा कोहलीने या पॉडकास्टमध्ये केला. 

आणखी वाचा

सलग सिक्स मारण्याचे रियान परागचे भाकीत... दोन वर्षांनंतर ठरलं खरं X POST VIRAL

marathi.ndtv.com