दिशा सालियानच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: IANS दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावरुन राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय.
दिशाचे वडील सतीश यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेऊन मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केलीय.
Image credit: PTI याचिकेमध्ये त्यांनी शिवसेना नेते (उबाठा) आदित्य ठाकरेंविरोधात FIR नोंदवण्याची मागणी केलीय.
Image credit: PTI तसेच हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचीही विनंती केलीय.
Image credit: PTI आदित्य ठाकरेंनी याबाबत 20 मार्चला पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Image credit: PTI मागील 5 वर्षांपासून माझी प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर हे प्रकरण कोर्टात असेल तर मी कोर्टातच उत्तर देईन : आदित्य ठाकरे
Image credit: PTI देशाच्या भल्यासाठी माझी लढाई सुरूच राहील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Image credit: PTI फडणवीस सरकारवर निशाणा साधत त्यांनी लक्ष भरकटवण्याचे काम सुरू असल्याचीही टीका केलीय.
Image credit: PTI हे सर्व मला बदनाम करण्याचे षड़यंत्र असल्याचेही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
Image credit: PTI आणखी वाचा
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा संसार मोडला, घटस्फोट मंजूर
marathi.ndtv.com