तुम्हीही सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलाय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

Edited by Harshada J S Image credit: Canva 

सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्याचा थेट संबंध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Image credit: Canva

सोशल मीडियावर नियमित 3 तासांपेक्षा अधिक वेळ घालवणाऱ्या मुलांमध्ये नैराश्य-चिंतेची समस्या उद्भवण्याचा धोका अधिक असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Image credit: Canva

सोशल मीडियाच्या वेडापायी जगभरातील लोकांमध्ये एकटेपणाची भावना वाढत असल्याच्या गोष्टीवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे. 

Image credit: Canva

संशोधनामध्ये 20-25% लोक एकटेपणाशी झुंज देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

Image credit: Canva

प्रत्यक्षात भेटून लोकांशी गप्पागोष्टी करण्याऐवजी हल्ली बहुतांश जण सोशल मीडियाद्वारेच संवाद-संपर्क साधताहेत. 

Image credit: Canva

परिणामी लोकांमध्ये एकटेपणाची भावना वाढत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Image credit: Canva

कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. पण यामुळे कळतनकळत एकटेपणा वाढतोय. 

Image credit: Canva

या समस्यांपासून बचाव करण्यासाठी पालकांनी मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. 

Image credit: Canva

सोशल मीडियाऐवजी मुलांना मैदानी खेळाची ओळख करून द्यावी तसेच त्यांचा लोकांमधील वावर वाढणेही गरजेचे आहे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पायासह तळव्यांचा मसाज करण्याचे अद्भुत फायदे

marathi.ndtv.com