एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (26 नोव्हेंबर) आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.   

Image credit: PTI

यावेळेस एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 

Image credit: PTI

नवे मुख्यमंत्री-कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत राज्यपालांनी एकनाथ शिंदेंकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवलीय. 

Image credit: PTI

राजीनामा देण्यापूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की, एकत्रित निवडणूक लढवून आम्ही जनतेचा विश्वास संपादन केला. 

Image credit: X Governor of Maharashtra

तसेच कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केलंय. 

Image credit: X Governor of Maharashtra

सशक्त महाराष्ट्रासाठी सशक्त युती आवश्यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

Image credit: X Governor of Maharashtra

सरकार स्थापनेसाठी महायुती लवकरच राज्यपालांकडे दावा करण्याची शक्यता आहे. 

Image credit: X Governor of Maharashtra

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 237 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट करणं भोवलं, रामगोपाल वर्मांना होणार अटक

marathi.ndtv.com